आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी-चिंचवडात राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे  - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादीच्या चार उमेदवारांची पत्रके हातात घेऊन मतदारांना पैसे वाटणाऱ्या तिघांना पाेलिसांनी साेमवारी रात्री वाल्हेकरवाडी परिसरातील बिजलीनगर येथे पकडले. त्यांच्या ताब्यातून ३४ प्रचार पत्रके व त्यांच्या कारमधून १५ हजार रुपये जप्त करण्यात अाले अाहेत.   

मयूर दिलीप पवार (वय २१, रा. साखरवाडी, ता. फलटण, सातारा), राहुल बाबूराव मदने (२१, रा. सातारा) व संताेष रामनाथ पाेकळे (वय २६, रा. वाकड, पुणे) अशी ताब्यात घेण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. शिवनगरी भागात गाड्यावर फिरून पैसे वाटप हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती.
 
 पाेलिस शिपार्इ डी. एल. साळवे हे पेट्राेलिंग करत असताना त्यांना वाल्हेकरवाडी परिसरात एक संशयित कार सापडली. या गाडीच्या डॅश बाेर्डवर प्रचारपत्रके दिसली. चाैकशी केली असता चालक त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पाेलिसांनी गाडीतील तिघांना चिंचवड पाेलिस चाैकीत अाणले. कारची झडती घेतली असता त्यात १५ हजार रुपये व  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब भाेर्इर यांच्यासह इतर चार उमेदवारांचे फाेटाे असलेली प्रचारपत्रके दिसून अाली. १९ फेब्रुवारी राेजी सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर प्रचार बंद झालेला असताना उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात अाला.   
 
निवडणुकीदरम्यान वादावादीचे प्रकार   
पुण्यातील महर्षीनगर येथे मतदान यंत्राचा डेमाे नागरिकांना दाखविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पाेलिसांनी पकडले. पुण्यातील प्रभाग क्र. ९ मधील भाजप उमेदवार अमाेल बालवडकर यांनी बाेगस मतदार अाणल्याचा अाराेप इतर उमेदवारांनी केला. तसेच बाेगस मतदान अाणणाऱ्या तीन चारचाकी वाहनाच्या टायरमधील हवा साेडून दिली. तसेच बालवडकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. निगडीतील अमृता विद्यालय मतदान केंद्राबाहेर मनसे अाणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली, मात्र पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सदर कार्यकर्त्यांना पिंपरी पाेलिस चाैकीत अाणले.
 
राष्ट्रवादीच्या 13 जणांना पैसे वाटताना पकडले
 साेलापूर- जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी  कोळगाव ते शिंगोर्णी (ता. माळशिरस) रस्त्यावर मंगळवारी (दि. २१) पैसे वाटण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीच्या  १३ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून  ६७,१०० रोकड व जीप असा ऐवज हस्तगत केला आहे.  नानासाहेब  ज्ञानोबा कदम, उत्तम सीताराम कदम, संतोष मुरलीधर हजारे, बाबा महादेव हजारे, मच्छिंद्र  किसन हजारे, अशोक बापू कदम, शहाजी भगवान गोडसे, गजानन मधुकर कदम, सचिन शांताराम कदम, नवनाथ संदिपान पाटोळे, नागेश तुकाराम गोडसे, शिवाजी दादू धांडोरे, विठ्ठल दिगंबर कदम अशी संशयितांची नावे आहेत.  
 
दरम्यान, हे कार्यकर्ते अामच्या पक्षाचे नसल्याचा दावा ‘राष्ट्रवादी’चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी केला अाहे. कोळगाव येथे कोळगाव ते शिंगोर्णी रस्त्यावर संशयित हे  जीपमधून जात असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळले. त्यांच्या हालचाली  संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी जीप थांबवून त्याची झडती घेतली. त्यायांच्याकडे ६७,१००  रोकड आढळली. याप्रकरणी पोलिस नाईक विनोद अनंत साठे यांनी फिर्याद दिली. त्यांच्यावर भारतीय दंड विधान  १७१(फ)(ई), मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व मोटार अधिनियम कलम ६६(१) १९२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याचा पोलिस तपास करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...