आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्ट सर केल्याचा दावा; राठाेड दांपत्याची चाैकशी, पाेलिस अायुक्तांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जगातील सर्वाेच्च शिखर असलेल्या नेपाळ स्थित माउंट एव्हरेस्ट सर केल्याचा दावा पुणे पाेलिस दलातील कर्मचारी दिनेश राठाेड तारकेश्वरी दत्त या दांपत्याने केला हाेता. मात्र, पुणे पिंपरी- चिंचवड येथील काही गिर्याराेहकांनी यावर अाक्षेप घेत राठाेड दांपत्य चुकीची माहिती देत असल्याची तक्रार पाेलिस अायुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे केली हाेती. या पार्श्वभूमीवर पाेलिस अायुक्तांनी सदर माेहिमेच्या चाैकशीचे (सत्यता पडताळणी) अादेश दिलेले अाहेत.

पिंपरी-िचंचवड माउंटेनिअरिंग असाेसिएशनच्या गिर्याराेहकांनी राठाेड दांपत्य हे माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर गेलेच नसल्याचा दावा करत काही प्रश्न उपस्थित केले अाहेत. नाेव्हेंबर २०१४ मध्ये या दांपत्याने अाॅस्ट्रेलियातील सर्वाेच्च दहा शिखरे सर केल्याची माहिती दिल्यानंतर बातम्या प्रसिद्ध झाल्या हाेत्या. मात्र, त्यांनी केवळ पाच शिखरेच सर केली हाेती.
मात्र, त्यांनी ही दहा शिखरे सर केल्याचा खाेटा दावा केला हाेता, याकडेही तक्रारदारांनी लक्ष वेधले अाहे.

तक्रारीतील अाक्षेप
-२३मे २०१६ राेजी सकाळी ६.२६ मिनिटांनी एव्हरेस्ट सर केल्याचे राठाेड दांपत्य सांगतात. मग त्यांना हे सांगण्यासाठी पाच जूनची वाट का पाहावी लागली.
-काेणत्याही गिर्याराेहकाने शिखर सर केल्यानंतर त्याचदिवशी अथवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जाहीर केले जाते.
-दिनेश राठाेड यांचा शिखरावरील फाेटाे पाहिला असता, त्यांच्या गाॅगलमध्ये डाेक्यावर सूर्य चमकताना दिसत अाहे. म्हणजे दुपारच्या सुमारासचा सूर्य त्यांना सकाळी ६.२५ मिनिटांना कसा मिळाला?

-१९ ते २४ मे या कालावधीत एव्हरेस्ट कॅम्प परिसरात असणाऱ्या गिर्याराेहकांनी २१ ते २३ मे राेजी राठाेड दांपत्य एव्हरेस्टवरील कॅम्पवर दिसलेच नाहीत. अाम्ही त्यांना फक्त बेसकॅम्पवरच पाहिले हाेते, असे सांगितले अाहे.

-तक्रारदारांच्या मते, २२ मेनंतर एकाही भारतीयाने एव्हरेस्ट सर केले नाही. नेपाळ हवामान खात्याच्या अहवालानुसार २३ मे राेजी तेथील हवामान अत्यंत खराब हाेते. मग राठाेड दांपत्याच्या शिखरावरील फाेटाेत अनेक लाेकं दिसत असून ते काेण अाहेत?
बातम्या आणखी आहेत...