आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. अांबेडकरांचे ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिक लवकरच नव्या स्वरूपात प्रकाशित होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांनी सुरू केलेली लढाई अाणि उपस्थित केलेले प्रश्न अाजही नव्या स्वरूपात तसेच अाहेत. एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू ठेवतानाच वैचारिक प्रबाेधन झाले पाहिजे, या हेतूने बाबासाहेबांनी सुरू केलेले ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिक पुन्हा नव्या स्वरूपात सुरू करणार असल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी मंगळवारी दिली. 
   
अांबेडकर म्हणाले, प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे मुख्यालय मुंबई राहणार असून १० मे राेजी पहिला अंक प्रकाशित करण्यात येणार अाहे. या पाक्षिकाची जबाबदारी प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. अंजली मायदेव, किशाेर ढमाले, विलास टेकाळे, संदीप तायडे यांच्यावर असणार आहे.  डॉ. अांबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ही नियतकालिके त्यांच्या संघर्षाच्या विविध टप्प्यांवर सुरू केली. ‘जनता’चे प्रबुद्ध भारतमध्ये परिवर्तन करताना त्यांनी देशातील नागरिक हे प्रबुद्ध व्हावेत या अपेक्षेने त्याची सुरुवात केल्याची नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...