आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर गुन्हेगारीमुळे देशाची सुरक्षितता धोक्यात, सावध राहा - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुह्यांचे प्रमाण वाढले आहे, यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या अव्हानाला सामोरे जाण्यास समर्थ रहा, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज पुणे येथे बोलताना केले आहे. सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समरंभात ते बोलत होते. 

यावेळी 64 स्नातकांना बी. टेक. तर 5 स्नातकांना एम. टेक. पदवी प्रदान करण्यात आली. मुखर्जी पुढे म्हणाले, काही वर्षांपूर्वी सायबर गुन्हेगारीचा धोका नव्हता, पण आता याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे देशाच्या सुरक्षिततेला आव्हान निर्माण झाल आहे. तुम्ही येथे घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा या गुन्हेगारीच्या अव्हानाला संपवण्यासाठी कराल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...