आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे त्या विचारांचा अवलंब करुन करुन राज्यकारभार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरी ता. जुन्नर येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात केले.

शिवजयंती निमित्त आज शिवनेरी किल्ला शिवभक्तांच्या गर्दीने फुलला होता. शिवघोषाने दुमदुमून गेला होता. शिवजंयतीच्या सोहळयास पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आमदार शरद सोनवणे, आमदार विनायकराव मेटे, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच शिवप्रेमी नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते.
 
परकियांच्या आक्रमणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मुक्त केल्याचेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने रयतेला स्वाभिमान शिकविला. राज्यकारभार कसा चालवावा, याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श घालून दिला, असेही मुख्यमंत्री म्हणाले. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, आ.शरद सोनवणे यांचेही यावेळी भाषण झाले. 
 
शिवजन्मस्थळाचे ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे उपस्थितीत महिलांनी शिवजन्माचा पारंपारिक पाळणा सादर केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी येथील प्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध तरुण मंडळांनी मर्दानी खेळांची प्रात्यिक्षिक सादर केले. यानंतर शिवकूंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या पुतळयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून सवाद्य  मिरवणूकही काढण्यात आली.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...