आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे विमानतळ विस्तारीकरणासाठी संरक्षण विभागाची 18 एकर जागा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली /पुणे -(लाेहगाव) विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संरक्षण विभागाची अाणखी १८ एकर जागा देण्याकरिता केंद्रीय संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी बुधवारी तत्त्वत: मंजुरी दिली. यापूर्वी संरक्षण खात्यातर्फे १७ एकर जागा देण्याचा निर्णय झालेला अाहे.  
 
लाेहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संरक्षण विभागाची जागा अधिग्रहित करण्यासाठी गेले वर्षभर केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर अाणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट प्रयत्न करत अाहेत. बुधवारी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला.   
 
लाेहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संरक्षण विभाग १८ एकर जागा देणार असल्याचे पर्रीकरांनी मान्य केले. या भागात साडेतीन एकर जागेवर  संरक्षण विभागाचा इंधन डेपाे अाहे. त्याला पर्यायी जागा महाराष्ट्र सरकार देईल, अशी बापट यांनी ग्वाही दिली.
 
 यासाठी एअर फाेर्सचे व्हाइस चीफ शिरीष पै लवकरच पर्यायी जागेची पाहणी करण्यासाठी जाणार अाहे. त्यांचा अहवाल संरक्षण मंत्रालयास प्राप्त झाल्यानंतर विमानतळासाठीची जागा हस्तांतरित करण्यात येईल, असे पर्रीकर यांनी बैठकीत स्पष्ट केले. 
 
बातम्या आणखी आहेत...