आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील कचराकोंडी आंदोलन अखेर मागे; आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या २२ दिवसांपासून गाजणारा पुण्याच्या कचराकोंडीचा प्रश्न आणि आंदोलन मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रविवारी मागे घेण्यात आले. कचराकोंडी प्रश्नावर पालिका प्रशासन, स्थानिक नेते यांनी प्रयत्न केले होते. मात्र ते अयशस्वी झाले. त्यानंतर विरोधकांनी महापौर, आयुक्तांच्या परदेश दौऱ्याचे भांडवल करत कचरा प्रश्न लावून धरला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कचरा प्रश्नावर मार्ग काढण्याची मागणी केली.  त्यानुसार मुख्यमंत्री रविवारी पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी ग्रामस्थ, आंदोलकांशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. एक महिन्यात या प्रश्नावर उपाय करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याचे फुरसुंगी व उरळी देवाची येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.    

महिनाभरात सर्वंकष आराखडा    
‘कचराप्रश्नी एका महिन्यात सर्वंकष आराखडा केला जाईल. सर्वपक्षीयांचा समावेश त्यात असेल. सर्वांना आराखडा दाखवला जाईल. पदाधिकारी, ग्रामस्थांची मते विचारात घेतली जातील. पुणे मनपाने असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा. प्रस्ताव आल्यावर एका महिन्यात खास बाब म्हणून मंजुरी दिली जाईल,’ असे फडणवीस म्हणाले. बैठकीसाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह लोकप्रतिनीधींची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...