आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदाची हमी मिळताच ‘स्वाभिमान’ गळून पडला, राजू शेट्टींकडून मवाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उसाची ‘एफआरपी’ एका हप्त्यात न मिळाल्यास मंत्र्यांची दिवाळी सुखात जाऊ देणार नाही, असा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भाषा मवाळ झाल्याचे चित्र मंगळवारी पुण्यात दिसून आले. भाजपने मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु केल्याने हा बदल झाला असल्याचे मानण्यात येत आहे. जया शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या मराठी साम्राज्य सेनेतर्फे आयोजित मेळाव्याला ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर आदी उपस्थित होते. यावेळी जया शेट्टी यांना ‘स्वाभिमानी’चे प्रदेश उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले. या मेळाव्यात शेट्टी आणि खोत यांनी भाषणे केले मात्र त्यात सरकारविरोधी आक्रमकता नव्हती.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे हादरलेल्या भाजपने अाता मंत्रीमंडळात मित्रपक्षांना स्थान देण्याची घाेषणा केली अाहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून मंत्रिपदाच्या आशेवर टांगणीवर असलेला ‘स्वाभिमान’ गळून पडला अाहे. शेट्टी यांनी मात्र ही चर्चा खोडून काढली. ते म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्तार होणार असला तरी आम्ही कोणाकडे काही मागायला जाणार नाही. मंत्रीपद मिळणे हा आमचा हक्कच आहे. आमचे आमदार निवडून आले नसले तरी राज्यातील सत्तांतराला आमचा हातभार लागलेला होता. मुख्यमंत्र्यांना याची कल्पना आहे. एकरकमी ‘एफआरपी’ देण्याबाबत मंत्र्यांची उलटसुलट वक्तव्ये येत असली तरी आम्ही तडजोड करणार नसल्याचे शेट्टी म्हणाले.

लढा सुरूच ठेवू : खाेत
मंत्रिपद मिळो अथवा न मिळो, शेतकऱ्यांसाठीचा आमचा लढा सुरूच राहील, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. गुरुवारच्या साखर कारखानदारांच्या बैठकीलाही आम्ही उपस्थित राहून ‘एफआरपी’संदर्भातली भूमिका आग्रहाने मांडू, असे ते म्हणाले.