आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टी-सदाभाऊंचे भांडण चव्हाट्यावर, खोतांनी वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले पैसे केले परत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे जुने खंदे समर्थक संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष सदाशिव खोत यांच्यातील वादाने नवी पायरी गाठली आहे. कधीकाळी एकमेकांना केलेल्या आर्थिक मदतीची चर्चा दोघांनी चव्हाट्यावर आणली आहे. त्यामुळे दोघांच्या समर्थकांनी एकमेकांची टिंगल चालवली आहे. शेट्टी-खोत यांच्या राजकीय विरोधकांसाठी मात्र हा करमणुकीचा विषय बनला आहे.  
 
सदाशिव खोत यांनी शेट्टी यांच्या अधिपत्याखालील ‘स्वाभिमानी अॅग्रो’च्या नावाने अडीच लाख रुपयांचा धनादेश जमा केले. या व्यवहाराची बँक पावती खोत यांच्याकडून समाज माध्यमांमध्ये लीक करण्यात आली. यासोबत खोत यांनी शेट्टी यांना उद्देशून लिहिलेले पत्रही ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांमध्ये पोहोचवण्यात आले आहे. या प्रकारामुळे खोत आणि शेट्टी यांच्यातील संघर्षाने उचल खाल्ली आहे. स्वतः शेट्टी यांनी यासंदर्भात अजून मतप्रदर्शन टाळले आहे.  
 
खोत यांनी पहिल्यांदा सुरुवात केल्याचे शेट्टी समर्थकांचे म्हणणे आहे. तर शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमातून खोतांची बदनामी सुरू केल्याचा खोत समर्थकांचा आरोप आहे. खोत यांचे वडील मुंबईच्या रुग्णालयात असताना त्यांना आर्थिक मदत कोणी केली, यावरून वादंग सुरू झाले. त्याला निमित्त ठरली ती खोत यांच्या आईची इंग्रजी वृत्तपत्राला दिलेली मुलाखत.या मुलाखतीत खोत यांच्या वडिलांवर मुंबईत महागडे वैद्यकीय उपचार सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केल्याचे सांगितले हेाते. 
 
त्यानंतर शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी या वृत्ताला हरकत घेतली. शेट्टी यांनी खोत यांच्या खात्यात अडीच लाख रुपये भरल्याची पावतीदेखील समाज माध्यमांमध्ये तातडीने ‘लीक’ करण्यात आली. खोत यांना शेट्टी व महादेव जानकरांनी आर्थिक मदत केली असताना मुख्यमंत्र्यांची प्रसिद्धी केली जात असल्याचा दावा शेट्टी समर्थकांनी केला. त्याच्या प्रत्युत्तरात खोत यांनी आज अडीच लाख रु. शेट्टींना परत केले.  यानंतर शेट्टी समर्थकांनी खोत यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. शेकडो कार्यकर्त्यांकडून खोत यांनी नाना प्रकारे मदत घेतली. ते कोणाकोणाची मदत परत करणार, असे शेकडो प्रश्न त्यांना विचारले जात आहेत.  दरम्यान,खोतांना लोकांनी एवढी मदत केलीय की सात जन्मात ते फेडू शकणार नाहीत,असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माणिकराव कदम यांनी सांगितले .
 
चळवळीची हानी टाळावी  
- वास्तविक स्वतः राजू शेट्टी या संपूर्ण प्रकरणात स्वतः अवाक्षरही बोललेले नाहीत. सदाभाऊ खोत यांच्याकडूनही तीच अपेक्षा आहे. चळवळीची हानी होईल अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत. वैयक्तिक उणीदुणी काढण्याच्या नादात चळवळ बदनाम होता कामा नये. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा.”  
-प्रकाशराव भोईटे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, खोतांनी धाडलेल्या पत्राचा अंश...
बातम्या आणखी आहेत...