आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिष्यवृत्ती परीक्षा आता घेणार गॅप; शिक्षक-पालकांकडून मागवले अभिप्राय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - स्पर्धा परीक्षांची मिनी आवृत्ती मानल्या जाणाऱ्या चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता गॅप घेणार आहेत. तसेच चौथी आणि सातवीऐवजी पाचवी आणि आठवी इयत्तांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील शिष्यवृत्ती परीक्षा एकदम मार्च २०१७ मध्ये घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांमध्ये ज्या सुधारणा वा बदल अपेक्षित आहेत, त्याबाबतचे अभिप्राय शिक्षक आणि पालकांकडून मागवण्यात येत आहेत.
यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ही माहिती देण्यात आली. मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या सुधारणेबाबत शिक्षक आणि पालकांकडून मागवण्यात आलेले अभिप्राय प्रश्नावलीच्या स्वरूपात आहेत. शासन निर्णय २९ जून २०१५ नुसार यापुढे शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आणि आठवीमध्ये घेण्यात येणार आहेत. तसेच या योजनेचे नामाभिधान ‘उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना’ असे करण्यात आले आहे. नव्या योजनेत बदल अपेक्षित असून, त्यासाठीच शिक्षक व पालकांकडून प्रश्नावलींच्या स्वरूपात अभिप्राय मागवण्यात आलेत.

प्रश्नावलीतील मुद्दे
नव्या योजनेनुसार होणाऱ्या परीक्षेत कोणत्या विषयांचा समावेश असावा, विद्यार्थ्याचा स्तर कसा असावा, कालावधी, पेपरची संख्या, परीक्षा आजवर पाच तास होती, त्याचा ताण येत असल्याच्य तक्रारी येत असल्याने हा कालावधी कमी करावा का..आदी प्रश्नांचा यात समावेश आहे.

असे होते पूर्वीचे स्वरूप
पेपर १ : भाषा व इंग्रजी (गुण ७० व ३०)
पेपर २ : गणित व परिसर अभ्यास भाग १ (गुण ७० व ३०)
पेपर ३ : बुद्धिमत्ता चाचणी व परिसर अभ्यास भाग २ (गुण ७० व ३०)

मते जाणून घेणे गरजेचे
सन २०१७ मध्ये शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षेत कोणत्या विषयांचा समावेश करावा, विषयांची संख्या, प्रश्नपत्रिकांसाठी लागणारा वेळ, याबाबत शिक्षक व पालकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. आपले अभिप्राय १५ ऑक्टोबर २०१५ पर्यत राज्य परीक्षा परिषदेकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.