आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष ‘प्रयोगां’तून विज्ञानाचे शिक्षण; ‘विज्ञानशोधिका केंद्रा’तून संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुस्तकांमधील छापील शब्द, आकृत्या, नकाशे पाहून विज्ञान समजणे कठीण जाते, ही बहुसंख्य विद्यार्थ्यांची तक्रार असते. त्यावर आता पुस्तकांपेक्षा ‘प्रयोगा’तूनच वैज्ञानिक तथ्य जाणून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना ‘विज्ञानशोधिका केंद्रा’तून मिळणार आहे.
 
 
रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १९९२ मध्ये स्थापन झालेल्या ‘विज्ञानशोधिका केंद्रा’त आता विद्यार्थ्यांच्या प्रयोगशील मनांची जोपासना करण्यासाठी ‘इनोव्हेशन हब’ची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, उपसंचालिका नेहा निरगुडकर आणि भारती बक्षी यांनी ही माहिती दिली.   

विज्ञानशोधिकेच्या या इनोव्हेशन हबसाठी कोलकाता येथील नॅशनल सेंटर फॉर सायन्स म्युझियमची मान्यता मिळाली. या हबच्या उभारणीसाठी एक कोटीचा खर्च अपेक्षित असून त्यातील ५० लाख रुपये भारत सरकार, तर ५० लाख रुपये विज्ञानशोधिका केंद्र देणार आहे. एका वर्षात हे हब विद्यार्थ्यांच्या वापरासाठी खुले होईल. कुणाही विज्ञानप्रेमी विद्यार्थ्याला इथे संशोधन आणि प्रयोग करता येतील. 

महाराष्ट्रातील दुसरे हब पुण्यात  
देशात सात इनोव्हेशन हबआहेत.  मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये राज्यात पहिले तर अाता पुण्यात दुसरे हब हाेत असल्याचा झाल्याचा आनंद आहेच, तशीच जबाबदारीही आहे. एका वर्षात ते सुरू होईल.
-नेहा निरगुडकर,  उपसंचालक,  विज्ञानशोधिका केंद्र.

इनोव्हेशन हब   
- तीन हजार स्क्वेअर फूट जागेवर उभारणार   डिस्कव्हरी हॉल   
- हॉल फॉर फेम – आजवरच्या शोधगाथांची माहिती   
- तोड-फोड-जोड – उपकरणांचे सर्व भाग सुटे करून ते पुन्हा योग्य जुळवणे   
- कबाड से जुगाड – टाकाऊतून टिकाऊ   
- डिझाइन स्टुडिओ – वैज्ञानिक मॉडेल्स तयार करणे   
- डू इट युवरसेल्फ – कुतूहल वाटते ते करून पाहणे   
बातम्या आणखी आहेत...