आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीवर विशेष अधिवेशनासाठी दबाव, सरकारमधून बाहेर पडण्याचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजधानी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच पेटले आहे. जीएसटीच्या मंजुरीसाठी २० मे रोजी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचा कालावधी वाढवून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्या, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली, तर दुसरीकडे याच मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश सरकारला द्या, असा आग्रह विरोधी पक्षाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना भेटून धरला.

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या अाधी शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी लावून धरली.  पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे,  सर्व शेतकऱ्यांची तूर विकत घेणे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी यासाठी आणखी दोन दिवस अधिवेशन वाढवावे, अशी मागणी अाम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका अाहे. मुख्यमंत्र्यांनीही या मागणीबाबत सकारात्मकता दाखवत  भाजप गटनेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.
 
‘मुख्यमंत्र्यांसाेबतच्या बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा महत्त्वाचा विषय होता. तूर खरेदी आणि गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आम्ही केली,असे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस- राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी केली. शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करणे अत्यावश्यक झाले आहे, असे विखे पाटील यांनी राज्यपालांना सांगितले. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, संयुक्त जनता दलाचे कपिल पाटील आदी आमदार या वेळी उपस्थित होते. शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
 
राज्यपालांकडे वाचला अनागोंदी कारभाराचा पाढा
शासकीय तूर खरेदीतील अनागोंदीचा पाढा विरोधकांनी राज्यपालांकडे वाचला. सरकार कर्जमाफी देत नाही, अशी तक्रार केल्यावर राज्यपालांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
 
पुढील  स्लाइडवर वाचा
> तूर खरेदी आमच्यामुळेच : शिवसेनेचा दावा
> तुरीला बोनस, कृषिपंपांना बिलमाफी द्या : विखे
>  शेतकऱ्यांची साथ सुटणार नाही : सदाभाऊ खाेत 
>  तूर खरेदीत घाेटाळा...
 
हे पण वाचा,
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  ​ 
बातम्या आणखी आहेत...