आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपराजित पवारांच्या राजकारणाची सुुरुवातच पराभवाच्या छायेतून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- ‘सन १९६७ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटासाठी माझ्यासह ११ जण इच्छुक हाेते. ‘पवार साेडून काेणालाही उमेदवारी द्या,’ अशी ठाम भूमिका इतर दहा जणांची हाेती. मात्र, त्या वेळी यशवंतराव चव्हाणांनी ‘एक जागा गेली तरी चालेल’ अशी इतरांची समजूत काढून मला तिकीट दिले. अशा रीतीने पराभवाची दाट छाया असणाऱ्या बारामतीच्या तिकिटावर मी पहिल्यांदा विधानसभा लढवली अन् जिंकलीही. ही विजयी परंपरा अाजही कायम अाहे. बारामतीकरांनी मला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं,’ असे भावाेद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी काढली.   

सांसदीय कारकीर्दीची ५० वर्षे व पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल बारामतीकरांच्या वतीने करण्यात अालेल्या नागरी सत्कार साेहळ्यात पवारांनी बारामतीकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘बारामतीकरांनी मला राजकारणात ५० वर्षे स्थिरता दिली.  अाजवर पवारांच्या विरोधात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा झाल्या, मात्र बारामतीकरांनी फक्त पवारांनाच मतदान केले. म्हणूनच अखेरच्या श्वासापर्यंत मी बारामती, महाराष्ट्र अाणि देशाच्या विकासासाठी झटत राहील,’ असा शब्द पवारांनी दिला. या वेळी मंचावर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, हेमंत टकले, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार आदी उपस्थित हाेते.  

‘शालेय जीवनात अापण फारसे हुशार नव्हताे. केवळ सायकल बक्षीस मिळावी, म्हणून प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवण्याची मनात बाळगलेली इच्छा मात्र अापण पूर्ण करून दाखवली,’ ही अाठवणही पवारांनी सांगितली. सत्ता येते अन् जाते, पण या राजकीय शक्तीचा वापर शेतकरी, दलित, आदिवासी, उपेक्षित गरीब यांच्यासाठी करायचा असताे. या वर्गासाठीच सत्ता असते. राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटलांच्या चरित्र्यातून हे शिकायला मिळाले, असेही पवारांनी सांगितले.  

आता दुसरी राजकीय इनिंग खेळणार नाहीच  
‘देशात लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा आणखी एक राजकीय इनिंग खेळावी,’  अशी इच्छा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. त्यावर ‘आता आणखी राजकीय इनिंग नाही. निवडणुकीत उभा राहणं मी साेडून दिले अाहे,’ असे उत्तर पवारांनी हसतमुखाने दिले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...