आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळ यानाचे संदेश थेट खाेडदच्या महादुर्बिणीत, नॅशनल सेंटर फाॅर रेडिअाे अॅस्ट्राेफिजिक्सची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अांतरराष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत युराेपियन स्पेस एजन्सी (इसा) ने एग्झाेमार्स ट्रेस गॅस अाॅर्बाटर (टीजीअाे) हे यान अाणि शिअापॅरेली या मंगळवार उतरणाऱ्या कुपीचे प्रक्षेपण १४ मार्च राेजी केले हाेते. मंगळावरील जीवसृष्टीची माहिती मिळवणे, तेथील भाैगाेलिक रचनाचे निरीक्षण करणे यासाठी हे यान साेडण्यात अाले.
१६ अाॅक्टाेबर राेजी हे यान मंगळाच्या कक्षेत दाखल झाले. त्यानंतर यानाचे पॅराशूट उघडल्यानंतर कुपी वेगळी हाेऊन ते मंगळ ग्रहावर पाेहाेचल्याचा सिग्नल खाेडद येथील महाकाय मीटरवेव्ह रेडिअाे दुर्बिणीने (जीएमअारटी) यशस्वीपणे िदला असल्याची माहिती नॅशनल सेंटर फाॅर रेडिअाे अॅस्ट्राेफिजिक्सचे (एनसीअारए)अधिष्ठाता प्रा.यशवंत गुप्ता व स्वर्ण घाेष यांनी िदली.

जीएमअारटीच्या नियंत्रण कक्षात बुधवारी सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी सिग्नल मिळण्यास सुुरुवात हाेऊन, अाठ वाजून २७ मिनिटांनी कुपीने मंगळाच्या वातावरणातून शेवटचा सिग्नल िदला. त्यानंतर सदर कुपीशी संपर्क तुटला. जीएमअारटीच्या नियंत्रणकक्षेत इसाच्या अवकाश कुपीचे अालेले सिग्नल क्षीण हाेते. युराेपच्या यानाकडून येणारे सिग्नल अतिशय क्षीण असल्याने त्यांना संवेदनशील रेडिअाे टेलिस्काेपीची अावश्यकता हाेती. त्याचप्रमाणे यान मंगळावर पाेहाेचले तेव्हा त्या रेडिअाे टेलिस्काेपच्या अाकाशत मंगळ असणे अावश्यक हाेते. जीएमअारटीने नासाच्या जेट प्राेपल्जन लॅबाेरेटेरीच्या साेबत विशेष साॅफ्टवेअर विकसित केले अाहे. त्यामुळे जीएमअारटीला यानाकडून मिळणारे सिग्नल थेट युराेपमध्ये दिसू शकले, असेही गुप्ता यांनी सांगितले.
खाेडद सर्वाेत्तम ठिकाण
एनसीअारएचे अधिष्ठाता प्रा.यशवंत गुप्ता म्हणाले, ही घटना अापल्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून अांतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलाैकिक वाढवणारी अाहे. खाेडद येथील जीएमअारटीची फ्रिक्वेन्सी संवेदनशील असून याठिकाणी काेणत्याही प्रकारचे प्रदूषण नसल्यामुळे यानाचे िसग्नल काेणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट िटपता येत अाहे. अमेरिका व जर्मनी याठिकाणांचा विकल्प असतानाही त्यापेक्षा खाेडदचे ठिकाण सर्वाेत्तम असल्याने त्याची सदर प्रकल्पासाठी निवड करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...