आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत दगडूशेठ यंदा ब्रह्मणस्पती मंदिरात बसणार, गणेशाला 40 किलो सोन्याचे नवे अलंकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - प्राचीन वाङ‌्मयातील उल्लेखांनुसार  साकारण्यात येणाऱ्या ‘ब्रह्मणस्पती मंदिरा’त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची मूर्ती  विराजमान होणार आहे. मंडळाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने वेगळी सजावट करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी दिली.    

दरवर्षी मंडळातर्फे  देशातील  वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचा देखावा सजावटीसाठी उभारला जातो. यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून गणेशाला ४० किलो सोन्याचे नवे अलंकार घडवण्यात आले आहेत. आकर्षक नक्षीकाम, गजशिल्प, मयूरतुरे, नवग्रहांसह अन्य मौल्यवान खड्यांची सजावट असणारा साडेनऊ किलो सोन्याचा मुकुट तयार केला अाहे. याशिवाय  रत्नजडित असा शुंडहार, दोन किलो सोन्याचे कान, अडीच किलोचा अंगरखा, साडेतीन किलोचे उपरणे, सव्वासहा किलोचे सोवळेही घडवले आहे. यासाठी महाराष्ट्र, बंगाल आणि कर्नाटकचे ४० कारागीर ५ महिने कार्यरत होते.

मंदिराच्या देखाव्याची रचना
- १११ बाय ९० फूट व ९० फूट उंच   
- गोलाकार घुमटाखाली  ३६ फुटी गाभारा   
- त्रिशूल, अंकुश, कमळ यांची मंदिरावर स्थापना   
- गज, मयूर, गाय यांच्या शिल्पांनी सजलेले खांब   
- काचेच्या झुंबरांवर ब्रह्मणस्पती व गणेशयंत्र   
- सव्वा लाख दिव्यांनी  मंदिर उजळणार
 
बातम्या आणखी आहेत...