आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: नालेसफाईवरुन भाजपवर आरोप करणाऱ्या माजी महापौरांवर स्थायी समिती अध्यक्षांचा पलटवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुणे महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्यापासून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाले सफाईवरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. नाले सफाईत होत असलेली दिरंगाई हा मुख्य मुद्दा असून नाले सफाईचे 100 कोटींचे कंत्राट भाजप खासदाराशी संबंधित कंत्राटदाराला दिल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मात्र हा आरोप करणाऱ्यांनी आपल्या कारकिर्दीकडेही एकदा डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे असे स्थायी समिती सभापती मुरलीधर मोहळ यांनी म्हटले आहे.
 
सभापती मोहळ म्हणाले, नाले सफाईच्या कामामध्ये प्रशासनाकडून दिरंगाई होते, हे निश्‍चित आहे. परंतू नालेसफाईचे 100 कोटी रुपयांचे काम कर्नाटकातील भाजप खासदाराशी संबधित ठेकेदाराला दिल्याचा विरोधकांचा आरोप बिनबुडाचा आणि निव्वळ राजकीय हेतून प्रेरीत आहे.' पावसाळी कामाचा पंचवार्षिक अराखडा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत असतानाच मंजूर केल्याचे सांगत मोहळ यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांना टोला लगावला आहे. मोहळ म्हमाले, 'शहरात  पावसाळ्यात धोकादायक ठरणार्‍या ठिकाणी कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी गटारे करणे, रिटेनिंग वॉल तयार करण्यासाठीचा पंचवार्षिक आराखडा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या काळातच तयार करण्यात आला असून यावर्षी दुसर्‍या टप्प्यातील 100 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतू अवघ्या काही महिन्यांपुर्वी महापौर पदावरून पायउतार झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक प्रशांत जगताप यांचा ठेकेदारांच्या आडून भाजपवर आरोप करण्याचा उद्देशच संशयास्पद आहे.' 
   
मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषद घेउन मागील दोन दिवसांपासून विरोधी पक्षनेते चेतन तुपे आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पलटवार केला. चेतन तुपे आणि प्रशांत जगताप यांनी  शहरातील नालेसफाईसाठी 100 कोटी रुपयांच्या निविदा काढूनही नालेसफाईची कामे झाली नाहीत. त्यामुळे पहिल्या दोन पावसांतच पुणेकरांची दैना झाली. भाजपच्या कर्नाटकातील खासदाराच्या नातेवाईक असलेल्या ठेकेदारासाठीच या निविदा काढल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुरलीधर मोहोळ म्हणाले, नाले सफाईची कामे क्षेत्रिय कार्यालय पातळीवर केली जातात. परंतू पावसाळ्यात शहरात काही ठिकाणी नाले अडविल्याने, वळविल्याने तसेच पावसाळी गटारांची कामे झाली नसल्याने अशी ठिकाणे निवडूण तेथे कल्व्हर्ट बांधणे, रिटेनिंग वॉल बांधणे अशी कामे मागील वर्षापासून करण्यात येत आहेत. यासाठी पाच वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या कामांसाठी 103 कोटी रुपयांची तरतूद केली होती. सत्ताबदलानंतर आम्ही मंजुरी दिलेल्या 100 कोटी रुपयांच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाचे टेंडरही निवडणुकीपुर्वी निघाले होते. आचारसंहिता संपल्यानंतर त्याला मंजुरी देण्याचे काम आम्ही केले आहे. परंतू केवळ राजकिय हेतूने विरोधक भाजपवर आरोप करून दिशाभूल करत आहेत. महापौर राहीलेल्या व्यक्तिलाही हे समजत नसल्याने त्यांच्या उद्देशाबद्दलच शंका येत आहे.
 
बरेतर ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे, तो मागील दहा वर्षांपासून महापालिकेची कामे करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात त्याने 560 कोटी रुपयांची कामे केली आहेत. जो ठेकेदार दहा वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात काम करत होता, तो सत्ताबदलानंतर भाजप खासदाराचा नातेवाईक असल्याचा साक्षात्कार होतो, यातूनच विरोधकांचा उद्देश स्पष्ट दिसत असल्याचा चिमटाही मोहोळ यांनी काढला. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...