आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वच साहित्य संमेलनांना मिळणार अनुदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दरवर्षी २५ लाख रुपयांचे अनुदान देते. मात्र, राज्यात इतरत्र होणाऱ्या साहित्यविषयक संमेलनांनासुद्धा सरकारी अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी संबंधित संस्थांनी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवायचे आहेत.
याआधी सांस्कृतिक विभागाकडून संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थेला अनुदान दिले जात असे. मात्र, आता राज्य साहित्य व संस्कृती मंडळामार्फतच हे अनुदान दिले जाणार आहे. इच्छुक संस्थेने करावयाचा अर्ज शासनाच्या तसेच मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हे आहेत मुख्य निकष
-किमान पाच वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत संस्था हवी
-अर्जासोबत पाच वर्षांच्या कामाचा अहवाल जोडणे बंधनकारक
-अनुदान फक्त त्या आर्थिक वर्षापुरतेच असेल
-या रकमेच्या खर्चाचा तपशील सादर करणे अनिवार्य
-अर्ज साहित्य व संस्कृती मंडळाकडे सादर करायचा आहे
-संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी. मालकी हक्काची नको
-अर्ज करताना मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल जोडणे आवश्यक