आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळे आणि सदानंद यांचे कसे जुळले लग्‍न ? अशी होती कॉलेज लाइफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - खासदार सुप्रिया सुळे या ज्‍येष्‍ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुरब्बी राजकारणी शरद पवार यांच्‍या कन्‍या. राजकारणाचा वारसा असतानाही ताईंनी स्‍वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला. त्‍यांचे वडील शरदराव मुख्‍यमंत्री असतानाही त्‍या एसटी बसनेच कॉलेजमध्‍ये ये-जा करत. त्यानंतर पुण्‍यातून प्रकाशित होणा-या एका अग्रगण्‍य दैनिकात त्‍यांनी काही काळ नोकरीही केली. दरम्‍यान, त्‍यांची आणि सदानंद सुळे यांची ओळख झाली. पुढे दोघे लग्‍नाच्‍या बेडीत अडकले. येत्‍या गुरुवारी (10 डिसेंबर) पवारांच्या आत्‍मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. या निमित्त आम्ही सुप्रियाताईंची माहिती आपल्यासाठी घेऊन आलोय. सुप्रियाताई आणि सदानंद यांची पहिली भेट कुठे झाली, ताईंचे कॉलेज जीवन कसे होते, याची रंजक माहिती....
असे गेले ताईंचे बालपण
शरदरावांचे प्रतिभाताईंशी ज्‍या वेळी लग्‍न ठरले त्‍यावेळी त्‍यांनी एकच अट घातली होती. ती म्‍हणजे, आपल्याला एकाच मूलं हवं. मग ते मुलगा असो की मुलगी. 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रिताईंचा जन्म झाला. त्‍या एकुलती एक मुलगी आहे, असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तब्बल 44 वर्षापूर्वी जेव्हा समाज एवढा पुढारलेला नसताना दोघांनी हा निर्णय घेतला होता. त्यातून दोघांच्या आधुनिक विचारांमधील परिपक्वता अधोरेखित होते. अशा उच्‍च विचारांच्‍या कुटुंबात सुप्रिताईंची जडणघडण झाली. त्‍यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र्य होते. अमुकच शिकलं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे, अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत, न लग्नाबाबत. त्‍यांच्‍या आयुष्याचे सगळे निर्णय त्‍यांनीच घेतले आणि विशेष म्हणजे त्‍यांचे आईबाबा आणि कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा,
- कॉजेलमध्‍ये होत्‍या खूप लाजाळू, मुख्‍यमंत्र्यांची मुलगी असूनसुद्धा बसने करत ये-जा...
- सदानंदरावांशी कशी झाली ओळख..?
- बाळासाहेब ठाकरेंच्‍या आहेत भाचेसून...