आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीत बेकायदा जमावाचा गाेंधळ; भिडे गुरुजींवर गुन्हा, एक हजार जणांवर पुणे पाेलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या  पालखी मार्गावर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी व त्यांच्या  कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी विनापरवाना बेकायदेशीर जमाव जमविल्याबद्दल पालखी साेहळ्यातील विश्वस्तांनी पाेलिसांत तक्रार दिली हाेती. डेक्कन पाेलिसांनी याप्रकरणी संभाजी विनायकराव भिडे गुरुजी यांच्यासह एक हजार जणांवर गुन्हा दाखल केला अाहे. या जमावावर कलम १४३, ३४१ (बेकायदेशीर जमाव जमवून अन्यायाने प्रतिबंध करणे) सह महाराष्ट्र पाेलिस अधिनियमचे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.   
 
संभाजी भिडे गुरुजी व कार्यकर्त्यांनी विनापरवाना एकत्रित येत परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर बेकायदेशीरपणे वारकऱ्यांना अडथळा निर्माण केला. तसेच बेकायदेशीरपणे ध्वनिक्षेपकाचा वापर करून घाेषणा देत संभाजी महाराज पुतळा परिसरात एकत्रित जमवून व विनापरवाना सभा घेऊन कार्यकर्त्यांना संबाेधित केले अाहे. मागील दाेन ते तीन वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक डाेक्याला भगवे फेटे बांधून व हातात तलवारी घेऊन पायी वारीत घाेषणाबाजी करत सहभागी हाेत हाेते. 
बातम्या आणखी आहेत...