आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 लाख किमतीच्या कासव, मांडुळांच्या तस्करीचा प्रयत्न, पुण्यात तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बाजारपेठेत सुमारे ३५ लाख रुपये किंमत असलेल्या दोन मांडूळ आणि कासवांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. त्यांच्याकडून दोन मांडूळ आणि दोन दुर्मिळ कासवे जप्त करण्यात आली आहेत. हे  कासव आणि मांडूळ वनाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
 
पाेलिसांनी दत्तवाडी, हॉटेल सवाई, सिंहगड रस्ता येथे सापळा रचला होता. तीन जण कापडी पिशव्या घेऊन येताच बनावट गिऱ्हाइकाद्वारे त्यांना जाळ्यात अडकवून अटक कण्यात अाली.
सिद्धार्थ ज्ञानेश्वर काठोते (२०, रा. अंबड, जि. जालना, सध्या राहणार दत्तवाडी, पुणे), शाकीर जमील शेख (१९, रा. डोणजे गाव, पुणे) आणि फरदीन अशरफ खान (१९) अशी अाराेपींची नावे अाहेत.
 
या तिघांकडून गडद चॉकलेटी रंगाचे दोन मांडूळ (एकाची लांबी ९६ सेंमी, वजन ८४८ ग्रॅम, दुसऱ्याची लांबी १०१ सेंमी, वजन ९८० ग्रॅम) तसेच दोन राखाडी रंगाची कासवे (मोठे कासव लांबी २३ सेंमी, वजन एक किलो ४० ग्रॅम, छोटे कासव लांबी १८ सेंमी, वजन ७४२ ग्रॅम) जप्त करण्यात अाले. मोठे मांडूळ १५ लाख रुपये, छोटे मांडूळ १९ लाख रुपये तर कासवांना प्रत्येकी पाच लाख रुपये किंमत मिळणार होती. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...