आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा, राज्यभरात 17 लाख, 66 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) मंगळवारपासून सुरू होत आहे. ७ मार्च ते एक एप्रिल या काळात ही परीक्षा होईल. राज्यभरातून १७ लाख, ६६ हजार, ९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात ९ लाख ८९ हजार ९० विद्यार्थी तर ७ लाख, ७६ हजार, १९० विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण २१ हजार ६८६ शाळांतून या विद्यार्थ्य्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षेसाठी राज्यभरातील ४ हजार ७२८ केंद्रे सज्ज आहेत. दहावीची लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये  १६ लाख ५२ हजार २७० नियमित विद्यार्थी असून, ६४ हजार ४१२ पुनर्परीक्षार्थी आहेत. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी ही माहिती दिली.

कृतीपत्रिकेवर प्रश्नपत्रिका : या वर्षीपासून प्रथमच नियमित आणि पुनर्रपरीक्षार्थी सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि संयुक्त भाषा विषयांसाठीच्या प्रश्नपत्रिका कृतीपत्रिकेवर आधारीत असतील. त्याचा सराव राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आला आहे.
 
परीक्षेची वैशिष्ट्ये
प्रत्येक पेपरमध्ये खंड
जिल्हानिहाय समुपदेशक
इंग्रजी, गणित, सामान्य गणित विषयाच्या बहुसंची प्रश्नपत्रिका
राज्यभरात २५० भरारी पथके
अपंग गटांतून ७ हजार ४१४ विद्यार्थी परीक्षा देणार
आऊट ऑफ टर्न परीक्षेचा पर्याय ३ ते ५ एप्रिल दरम्यान
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...