आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आण्णा पायी दिंडीत चालले, तुकोबाराय-निळोबाराय पालखी सोहळ्याची इंदापूरात भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आण्णा हजारे यांनी काही अंतर पायी चालत पालखी सोहळ्यात सहभागी झाले. - Divya Marathi
आण्णा हजारे यांनी काही अंतर पायी चालत पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
बारामती - स्वता: आण्णा हजारे यांनी पुढाकार घेत सुरू केलेला संत निळोबाराय पालखी सोहळ्यास जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी काही अंतर पायी चालत पालखी सोहळ्यात सहभागी झाले. जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजाच्या किर्तनात टाळ वाजवून साथसंगत करणाऱ्या चौदा टाळकऱ्यांपैकी एक निळोबाराय हे  पिंपळनेर (ता.पारनेर, जि. अहमदनगर) गावचे होते. तुकाराम महाराजांचे त्याचे शिष्यत्व पत्करले. या गुरूशिष्यांच्या पादुकांची भेट इंदापूर येथे आज झाली. त्यासाठी स्वता: आण्णा हजारे दिंडीत चालले.
 
संत तुकाराम महारांजाच्या भेटीसाठी संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर निळोबारांयांनी तुकाराम महाराजांच्या धावा करत इंद्रायणीतीरी अनुष्ठान केले. तुकाराम महाराजांनी निळोबारायांना दर्शन दिले. अशे वारकरी मंडळी सांगतात. त्यानंतर आता पुन्हा निळोबाराय व तुकाराम महाराज यांच्या पालखीतील पादुकांची भेद इंदापुर शहरातील नारायणदास रामदास हायस्कुल प्रांगणात झाली. पूर्वी संत निळोबाराय पालखी सोहळा पिंपळनेर-करमाळा-टेंभूर्णी- पंढरपुर या मार्गाने जात होता. मात्र पालखी सोहळ्यातील प्रमुख मंडळींनी त्यांत बदल करून पिंपळनेर-भिगवण-इंदापुर- टेंभुर्णी- पंढरपुर असा मार्गाने नेणार आहेत. म्हणून दोन्ही पालखी सोहळ्याचा संगम मंगळवारी इंदापूरात झाला. 
 
आण्णाची पायी वारी
निळोबाराय पालखी सोहळ्याचे जनक जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी इंदापुर तालुक्यातील लोणी देवकर ते इंदापुर असा पायी वारीत सहभागी घेत वारीचा आनंद घेतला. 
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो आणि व्हिडिओ...
 
हे पण वाचा, 
बातम्या आणखी आहेत...