आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यसमीक्षक विभा देशपांडे यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी नाट्यक्षेत्रात गेली ४५ वर्षे सातत्याने आस्वादक नाट्यसमीक्षा लिहिणारे ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. तथा विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (७९) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या वेळी डॉ. देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
बातम्या आणखी आहेत...