आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधुभेटीने भारावले वारकरी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, सोपानकाकांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टप्पा पालखी मार्गावरून - गोकुळाच्या सुखा, अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी, आनंदल्या नरनारी या संतोक्तीप्रमाणे रविवारी संध्याकाळी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर रविवारी माउलींच्या व सोपानकाकांच्या पालखी भेटीचा सोहळा रंगला.
रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पालखी मार्गावर असलेल्या दसूर पाटी येथे बंधुभेटीचा नयनरम्य सोहळा उत्साहात पार पडला. दोन्ही पालख्यांच्या प्रमुखांनी पालखी जवळ येताच एकमेकांना मानाचे श्रीफळ दिले. थोड्या वेळानंतर पुन्हा सोपानकाकांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.
यांची होती उपस्थिती : आमदार बबनराव शिंदे, वसंतराव काळे, कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार गजानन गुरव, शिवसेनेचे संभाजी शिंदे, हणमंत माशाळे यांच्यासह अनेक मान्यवर, भाविकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
पालखी मार्गावर असलेल्या दसूर पाटी येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व सोपानकाकांच्या पालखी भेटीचा बंधुभेटीचा नयनरम्य सोहळा उत्साहात पार पडला.
ही प्रथा, हा मान
सोपानकाका यांची पालखी दसूर पाटी येथे विसाव्यासाठी थांबते. पाठीमागून माउलींची पालखी टप्पा येथे विसाव्यासाठी थांबते. माउलींची पालखी आल्यावर दोघांची बंधूभेट होते. येथे दोन्ही पालख्यांचे प्रमुख एकमेकांना श्रीफळ देतात. इथून सोपानकाकांची पालखी पुढे निघते आणि माउलींची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामासाठी विसावते. पालखी सोहळ्यातील ही पहिली बंधुभेट असते.

आज आहेत दोन रिंगण
सोमवारी भंडीशेगाव ते वाखरीदरम्यान बाजीराव विहीर येथे गोल रिंगण आणि एक उभे रिंगण होणार आहे. हा सोहळादेखील पाहण्यासारखा असतो.

पालख्या सजल्या फुलांनी
माउलींच्या पालखीच्या सजावटीत दररोज पुणे मार्केट यार्डातून ताजी फुले आणण्यात येतात. यासाठी सेवा करणार्‍या सेवेकर्‍यांची वेगळी टीम आहे हे विशेष.