आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची अश्लील चित्रफीत करून खंडणीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - व्याजाने दिलेले पैसे परत न करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाचे तिघांनी अपहरण करून त्याला एका फ्लॅटमध्ये बंद केले. त्यानंतर त्याला नग्न करून त्याची व्हिडिओ क्लिप तयार करून दीड लाखाची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, अश्लील चित्रफीत तयार केलेला मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे.

हर्षद गव्हाणे, विजय गव्हाणे आणि अभिषेक निवळकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. त्यांच्यासह निखिल मरळ, आसिफ खान, अतुल गायकवाड, विराज गव्हाणे यांच्याविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणाने विराज गव्हाणे याच्याकडून काही दिवसांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाचे पैसे वेळेत परत करू न शकल्याने विराज व त्याच्या भावाने वारंवार फोन करून धमकी दिल्याचे तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.