आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात आगामी दोन दिवस पावसाचे, शनिवारी राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची नाेंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जूनमहिन्यात पावसाने सरासरी गाठली नसली तरी जुलै महिन्याची सुरुवात आशादायक आहे. पहिल्या दोन्ही दिवसांत राज्यातील बहुतेक भागात पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. येत्या ४८ तासांत कोकण आणि मुंबई वगळता राज्यातील बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पुढील शनिवारपर्यंत राज्यात विविध ठिकाणी कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडेल, असा अंदाजही वेधशाळेने व्यक्त केला. शुक्रवारी आणि शनिवारी पावसाने राज्यात बहुतेक सर्व भागांत कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावली. कोकण मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून येत्या ४८ तासांत हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. उर्वरित ठिकाणी मात्र तुरळक अपवाद वगळता, मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस टिकून राहिल्यास पेरण्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.

येत्या शनिवारपर्यंत सातत्य
येत्याशनिवारपर्यंतराज्यातील अनेक भागात मध्यम आणि हलक्या पावसाचे सातत्य टिकून राहील, अशी शक्यता आहे. येत्या शनिवारपर्यंत ढगांची वाटचाल हवामानाचा अंदाज पाहता कोकणात रोज ४० ते ५० मिलिमीटर, विदर्भात ते १० मिमी, मराठवाड्यात ते १० मिमी तर उर्वरित महाराष्ट्रात १० ते १५ मिमी असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. -डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामानतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...