आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या आधीच निळू फुले नाट्यगृहांचे उद्‍घाटन, राष्‍ट्रवादीचे पदाधिकारी ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- पिंपळे गुरव येथे निळू फुले नाट्यगृहाच्या श्रेय वादावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली आहे. आज (शनिवारी) दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निळू फुले नाट्यगृहाचे उद्घाटन होणार होते. परंतु, त्या आधीच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी नाट्यगृहाचे उद्‍घाटन करून मोकळे झाले. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अजित पवारांना आमंत्रण नाही!
राष्ट्रवादीने केलेल्या कामाचे उद्घाटन होत असून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांना आमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे संतापलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही खेळी केली. उद्‍घाटानानंतर सर्वाना पोलिसांनी ताब्यातही घेतले. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ल्यात समजल्या जाणार्‍या  पिंपळे गुरव येथे हे नाट्यगृह आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी हे धाडस दाखवले आहे. दरम्यान, पुण्यात याआधी एका पुलाचे राष्ट्रवादीने असेच उद्घाटन केले होते.

संबंधित घटनेचे फोटो पाहाण्यासाठी... पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा
बातम्या आणखी आहेत...