आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाई वाड्यावर या\' असे फरमवणारा हा अस्सल खलनायक महिलांत होता अलोकप्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तारूण्यातील निळू फुले... - Divya Marathi
तारूण्यातील निळू फुले...
मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील जातीवंत कलाकार अशी ओळख मिळवलेल्या व मराठी रसिक प्रेक्षकांवर चार दशकाहून अधिक काळ अधिराज्य गाजवलेल्या अभिनेते निळू फुले यांनी 13 जुलै 2009 म्हणजेच बरोबर सहा वर्षापूर्वी या जगाचा निरोप घेतला होता. या घटनेला सहा वर्ष झाली असली तरी निळू फुलेंचा दर करारी आवाज रसिकांच्या मानत कायम आहे.
भाजीपाला ल लोखंड विकणा-या घरात जन्म झाला असला तरी आपल्या कर्तृत्त्वाने मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्ठीत निळूभाऊंनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला. 'बाई वाड्यावर या' या पाटलांच्या भूमिकेतील डॉयलॉग तर आजही लोकांच्या मनामनात राहिला आहे. आपली भूमिका ठामपणे वठविणारे निळूभाऊंना महिलांचा रोष मात्र कायम पत्करावा लागला.
पुण्यासारख्या शहरात निळूभाऊंचा जन्म झाला असला तरी ग्रामीण जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणार्‍या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला. जब्बार पटेल निर्मित सिंहासन, सामना यातील भूमिकांनी निळूभाऊंनी दर्जेदार अभिनेते असल्याचे दाखवून दिले. चार दशकाच्या कारकिर्दीत मराठी-हिंदी अशा सुमारे दीडशे चित्रपटात त्यांनी काम केले. सखाराम बाईंडर या मराठी नाटकाने तर निळूभाऊंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. सखाराम बाईंडरने मराठी रंगभूमीने वादळ उठले होते तर देशभर त्याची चर्चा सुरु होती.
नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही बरेच काम केले. सेवादलाच्या कलापथकाचे सदस्य असलेल्या निळू फुले यांनी 1958 च्या सुमारास पुण्यातील कलापथकाचे नेतृत्व केले होते. अशा या गुणवान खलनायकाने 13 जुलै 2009 रोजी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, त्यांचे आजही मराठी मनांवर गारूड कायम आहे.
पुढे पाहू या, निळूभाऊंचे काही निवडक PHOTOS....