आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळशी उपसभापतीच्या खुनाचा कट उघडकीस, खुनाकरिता फंड गाेळा करणारे नऊ जण अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वझरकर यांचा राजकीय व स्थानिक वादातून खून करण्याचा कट एका टाेळीने रचल्याचे पाेलिसांच्या चाैकशीत उघडकीस अाले अाहे.  खून करण्याकरिता पैसे गाेळा करण्याचे नियोजन आखण्यात आले. त्यासाठी हिंजवडी माण रस्त्यावरील लक्ष्मी पेट्राेल पंप येथे दराेडा टाकण्यासाठी अालेल्या नऊ जणांच्या टाेळीस पाेलिसांनी जेरबंद केले. चाैकशीदरम्यान अाराेपींनी पंचायत समितीचे उपसभापती वझरकर यांचा खून करण्याचे षडयंत्र रचल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी उमेश रघुनाथ वाघुलकर (वय ३८, रा. माण, मुळशी), याेगेश भाऊ गुरव (३२, रा. कर्वेनगर, पुणे), याेगेश अंकुश वेताळ (२३, रा. मलठण, ता. शिरूर, पुणे), विशाल नवनाथ वेताळ (२३, रा. शिरूर), विशाल अानंदा कळसकर (१९, रा. मलठण, ता. शिरूर, पुणे), चंद्रकांत दाेरसिंग थापा (३५, रा. कासारवाडी, पुणे), आदींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

नाशिक येथून अाराेपींनी अाणले पिस्टल   
युनिट दाेनचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले की, अाराेपींच्या ताब्यातून जप्त करण्यात अालेल्या पिस्टलपैकी चार पिस्टल मुख्य अाराेपी उमेश वाघुलकर याने नाशिक येथून अाणल्या अाहेत, तर कुख्यात गुंड शरद माेहाेळ टाेळीचा सदस्य याेगेश गुरव याने एक पिस्टल व रिव्हाॅल्व्हर आणले होते.
बातम्या आणखी आहेत...