आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊवर्षीय गाथाच्या विश्वविक्रमी नृत्यचकरी, एका मिनिटात 116 गिरक्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कथ्थक नृत्यात स्वत:भोवती वेगाने गिरक्या घेण्याला नृत्यचकरी अशी संज्ञा आहे. आजवरचे ११२ नृत्यचकरींचे जागतिक रेकॉर्ड हिमाचल प्रदेश येथील युवकाच्या नावावर होते. पुण्यातील नऊवर्षीय गाथा या मुलीने ११६ नृत्यचकरी घेऊन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लवकरच या विक्रमाची गिनिज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नाेंद हाेणार असल्याचा दावा अायाेजकांनी केला अाहे. त्यासाठीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात अाली अाहे.
 
कथक नृत्यांगना आणि नृत्यगुरू मनीषा साठे तसेच नीलिमा हिरवे यांनी गाथाचे कौतुक करून तिला आशीर्वाद दिले. गाथा संताेष राऊत ही पुण्याच्या नवीन मराठी शाळेत इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आहे. बालवयापासून तिला नृत्याची आवड आहे. त्यामुळे सहाव्या वर्षापासून ती कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहे. या अनोख्या विक्रमाच्या जोडीने गाथाने ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’साठी १५ मिनिटांत १४९१ गिरक्या घेण्याचा विक्रमही केला आहे. रेकॉर्ड बुकच्या सुवर्णा श्री गुरम यांनी गाथाला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन तिच्या विक्रमाची अधिकृत नोंद घेतली. या यशाबद्दल गाथाचे काैतुक हाेत अाहे.

माझे विक्रम दृष्टिहीनांना अर्पण  
गाथाने केलेले दोन्ही विक्रम तिने ‘निवांत’ संस्थेच्या दृष्टिहीन मुलांना समर्पित केले आहेत. अगदी छोटी असल्यापासून मला गिरक्यांची सवय आहे. एकदा बाबांनी (संतोष राऊत)  मला विचारले, तुला गिरक्या घेऊन चक्कर येत नाही का?, मी नाही म्हणाले. त्यानंतर बाबांनीच मला या नृत्यचकरींच्या विक्रमासाठी प्रोत्साहित केले, असे गाथा म्हणाली.
बातम्या आणखी आहेत...