आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरीचे पाणी कर्नाटक, तामिळनाडूला देण्याचा विचार,...तर पुण्याची दिल्ली; गडकरींचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोदावरीचे पाणी कर्नाटक, तामिळनाडूला देता येऊ शकेल. यात महाराष्ट्राचे कुठलेही नुकसान नाही, असे वक्तव्य केंद्रीय नितीन गडकरी यांनी पुण्यात केेले आहे. - Divya Marathi
गोदावरीचे पाणी कर्नाटक, तामिळनाडूला देता येऊ शकेल. यात महाराष्ट्राचे कुठलेही नुकसान नाही, असे वक्तव्य केंद्रीय नितीन गडकरी यांनी पुण्यात केेले आहे.

पुणे-  गोदावरीचे पाणी कर्नाटक, तामिळनाडूला देता येऊ शकेल. यात महाराष्ट्राचे कुठलेही नुकसान नाही, असे वक्तव्य केंद्रीय नितीन गडकरी यांनी पुण्यात केेले आहे. पेट्रोलला पर्याय शोधण्याची गरजही त्यांनी व्यक्त केले. पुण्यात इथेनॉल बसची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करतानाच.या बससाठी 60 रुपये प्रतिकिलोमीटर खर्च होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

 

...तर पुण्याची दिल्ली होईल

इंधनामुळं सध्या प्रदूषणाचे प्रमाण वाढलं आहे, दिल्लीमध्ये वेगळ्या इंधनाची कुजबुज असते. तर कधी कधी बाहेरून आलेले नागरिक देखील दिल्लीमध्ये येण्यास घाबरत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र जी परिस्थिती दिल्लीची झाली आहे तीच हळूहळू मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई या शहरांची होऊ शकते. त्या दिशेने या शहरांची वाटचाल होत असल्याची चिंता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. प्रदूषणाची समस्या ही गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

भोसरी येथे सीआयआरटी आयोजित 'इथेनॉल एक इंधन' कार्यशाळेचे उद्घाटन रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.  पुढे ते म्हणाले की, ग्रामीण भागातील बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे नागरिक हे पुण्या-मुंबईसारख्या शहरांकडे वाटचाल करत आहेत. गावात रोजगार नाही, चांगल्या शाळा नाहीत, रुग्णालये नाहीत. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत आहे तर शहराची वाढत आहे. 80 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहात होते, मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. 55 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहात आहेत, यामुळे शहरातील लोकसंख्या वाढत आहे. ही देशापुढील गंभीर समस्या असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

 

यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पालक मंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, माजी मंत्री अण्णासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...