पुणे - ड्रायव्हिंगच्या शास्त्रीय प्रशिक्षणासाठी पुण्यात पहिले इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग अँड ट्रेनिंग रिसर्च (आयडीटीआर) सुरू करण्यात आले आहे. सरकारचे म्हणणे असे की, या हायटेक प्रशिक्षणानंतर रस्ते अपघात ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतील. तसेच वाहन परवाने देत असताना होणार्या भ्रष्टाचारालाही आळा घालता येईल. कारण आता कॅमेर्यावर आधारित इनोव्हेटिव्ह ड्रायव्हिंग टेस्टिंग प्रणालीमुळे चालकाचे तंत्रज्ञानाच्या आधारे मूल्यांकन केले जाईल.
केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी या प्रणालीचे उद््घाटन केले. सरकारच्या निगराणीखाली देशभरात अशा स्वरूपाची आठ केंद्रे सुरू केली जातील. संस्थेत प्रशिक्षणासाठी ऑडिअो, व्हिज्युअल सुविधायुक्त मोठ्या क्लासरूम प्रत्येक प्रकारच्या रस्त्यांवर गाडी चालवण्याचा अनुभव असावा यासाठी ड्रायव्हिंग रेंज असतील. टेस्टिंग लॅब कार्यशाळा असेल.
येथे दरवर्षी २० हजार जणांना प्रशिक्षण दिले जाईल.पुण्यात सुरू होत असलेले या प्रकारचे हे देशातील पहिलेच केंद्र आहे. या आधारे वाहतुकीला शिस्त लावण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे.