आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीश भारद्वाज करणार दिग्दर्शनाचे ‘सारथ्य’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- छोट्या पडद्यावर गाजलेल्या महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते नितीश भारद्वाज आता चित्रपट दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसून नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे नितीश यांना त्यांच्या पदार्पणासाठी ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांची कथा मिळाली आहे. मूर्ती यांच्या ‘ऋण’ या गाजलेल्या कथेवर आधारित ‘पितृऋण’ हा चित्रपट ते दिग्दर्शित करणार आहेत.

भारद्वाज म्हणाले की, सुधा मूर्ती यांच्या साहित्याविषयी सुरुवातीपासूनच आस्था आहे. त्यांच्या कन्नड भाषेतील ऋण या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारला आहे. सचिन खेडेकर प्रमुख भूमिकेत असून बुजुर्ग अभिनेत्री तनुजा यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

मूळचा मी व्हेटर्नरी सर्जन आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आल्यावर मात्र मूळ व्यवसाय बाजूला राहिला. मधला काही काळ भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणूनही वावरलो. आता मोठ्या पडद्यावर दिग्दर्शनाचा प्रयत्न करून पाहणार आहे.