आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनांवर महामंडळाचे नियंत्रणच राहिलेले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राजसत्ता आणि धनदांडगे यांच्यामुळे साहित्य संमेलनांवर महामंडळाचे नियंत्रणच राहिलेले नाही, अशा स्पष्ट शब्दांत महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी कबुली दिली. संमेलनाचा सण साजरा करणे, एवढेच साहित्य महामंडळाचे काम उरले आहे. त्यासाठीच तीन दिवसांचा गणपती मंडपात बसवला जातो, असेही डॉ. जोशी म्हणाले.

साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय नुकतेच नागपूर येथे गेले आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. जोशी यांचा सत्कार मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी या वेळी डॉ. भालचंद्र जोशी यांच्याशी संवाद साधला.
शहरातच भाषिक प्रदूषण : मराठीच्या नावने गळा काढणारे शहरातच आहेत. ते दुटप्पी आहेत. मराठी भाषा ग्रामीण भागातच जिवंत आहे. प्रमाण भाषेचा आग्रह गैर आहे कारण बोलीभाषेमुळेच प्रमाणभाषा टिकून आहे, असे ते म्हणाले.
दरवर्षी संमेलन नकाे
दरवर्षी संमेलन नको, हे माझे वैयक्तिक मत आहे. पण मी लोकशाहीवादी आहे. त्यामुळे माझे मत हे महामंडळाचे मत मानले जाऊ नये. महामंडळ म्हणजे मी एकटा नव्हे. जे सर्वसंमतीने ठरेल, ते मला मान्य असेल,अशी स्पष्टोक्ती डॉ. श्रीपाद जोशी यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...