आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Coordination, Marathi Lanuage Respect Not Kept

मराठीच्या संमेलनात मायबोलीची ‘वाट’,व्यासपीठावील सांस्कृतिक विनोदांमुळे प्रेक्षकांची करमणूक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत सोपानदेव नगरी - फ.मुं.चे भाषण म्हणजे वेगळेच असणार, या अपेक्षेने अनेक जण बसले होते; पण इतर ‘मान्यवरां’नीच अनेक सांस्कृतिक विनोद केल्याने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. मराठी भाषेचा उत्सव पण त्याच भाषेत येणा-या शब्दांचा उच्चार, आरोह आणि अवरोह यांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या लकबी आणि आपल्या परीने लावलेल्या अर्थाने सांस्कृतिक विनोद निर्माण झाले. फ. मुं.नी मात्र आपल्या पद्धतीने त्याचा ‘समाचार’ घेतला.
मान्यवरांचे आगमन होण्यापूर्वीच सूत्रसंचालकानेच सांस्कृतिक विनोदाला सुरुवात केली. त्याला आगमन म्हणायचे होते, पण तो ‘आगमन’ म्हणत होता. सनई-चौघडे वाजवावे, असे म्हणायचे तर तो बिचारा त्याच्या भाषेत ‘सनई’ म्हणून गेला. त्यानंतर प्रास्ताविकासाठी रावसाहेब पवार उभे राहिले. त्यांनी तर कार्यक्रमाचा ‘कारेक्रम’ केला. सभागृहाला ते ‘सभा-ग्रह’ असे अनेकदा म्हणत होते. पुढे सूत्रे आली ती मुलाखतकार सुधीर गाडगीळांकडे... अस्खलित मराठी बोलणारे गाडगीळ या वेळी विनंतीऐवजी विनंती म्हणून गेले, तर महाराष्‍ट्रालाही त्यांनी ‘महाराष्‍ट्र’ संबोधले. एक-दोन ठिकाणी ते कोत्तापल्लेंना कोत्तापल्ले म्हणाले, तर एका ठिकाणी त्यांना सृजनात्मक म्हणायचे होते, पण त्यांनी त्याचे सर्जनात्मक केले. स्वागताध्यक्ष विजय कोलते हे तर पदस्पर्शाला स्पदस्पर्श म्हणत होते आणि साहित्य मंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनीदेखील पाठपुराव्याऐवजी ‘पाठवुरवा’ असा शब्दप्रयोग केला.
संमेलन नव्हे आंदोलन
मोठा हशा पिकला तो म्हणजे सासवडचे आमदार शिवतारे यांनी संमेलनाला ‘आंदोलन’ संबोधले तेव्हा... ते सावण्याचा मात्र त्यांनी खुबीने प्रयत्न केला. या गमतीत खासदार सुप्रिया सुळेही मागे नव्हत्या. त्यांनी ‘मारलिश’ (इंग्रजीतून मराठीत लिहिलेले) भाषण वाचून दाखवले. त्यात त्या तंत्रज्ञान तसेच टेक्नॉलॉजी म्हणताच तरुणांमध्ये खसखस पिकली. तसेच त्यांनी अत्रेंनाही आचार्य अर्ते संबोधले. त्यांना काही ठिकाणी औद्योगिक म्हणायचे होते, पण त्या औद्योजिक म्हणत होत्या.
मराठीचा उत्सव साजरा करत असलेल्या व्यासपीठावरूनच मायबोलीची ही दुर्दशा पाहून उपस्थित प्रेक्षकांना हसावे की रडावे हेच समजत नव्हते, काही ज्येष्ठ रसिकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली.
फ.मुं. बनले ‘मुख्यमंत्री’
फ. मुं.चा परिचय करून देण्यासाठी उभे राहिलेल्या प्रकाश महाजन यांनी तर संमेलनाध्यक्षांना बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्रीच संबोधले. बोलताना थोडा त्रास होत असला तरी एकही शब्द न चुकता बोलले ते म्हणजे उद्घाटक शरद पवार.
फ.मु.चे राईट वर्ड राईट इन प्लेस !
व्यासपीठावरील सांस्कृतिक विनोद फ.मुं. कान देऊन ऐकत होत. आपल्या भाषणात त्यांनी या सांस्कृतिक विनोदांना हेरले. मी काही फार विनोदी लिहित नाही. पण लिलाधर वनमाळी असे नावबदलून मी एकदाच विनोदी लिखाण केले. पण लोकांनी मला ‘लिलापुरुष’ संबोधले. अर्थात त्यातील सांस्कृतिक अर्थ समजून घ्यायचा असतो हे सांगायला ते विसरले नाही. दिव्याखाली अंधार या शब्दावरही फ.मुंनी अंधाराचं अधिष्ठान असल्याशिवाय दिव्याची उत्कटता अनुभवता येत नसल्याचे सांगितले. महाजनांनी त्यांचा संमेलनाध्यक्ष म्हणता म्हणता मुख्यमंत्री केला होता. पण फ.मु. आणखी पुढे जात म्हणाले ‘हे अखिल भारतीय संमेलन आहे. तुम्ही पंतप्रधान म्हणायला हवे होते.’ तसेच शिवनारे यांनी संमेलनाला आंदोलन म्हटल्याचेही अधोरेखित करतानाच ते म्हणाले की, हो आम्हीही येथे भाषेसाठी आंदोलनच करतो. हा शब्द खरा वाङ्मयातीलच आहे. फक्त तुमची तो उच्चारण्याची जागा चुकली. मित्राचं उदाहरण देतानाच त्यांनी कोटी केली. त्यांचा भाऊ एकदा त्यांना म्हणाला की दादा विदर्भात काय तुमचे ‘पॉप्युलेशन’ आहे. (प्रचंड हशा). त्याला खरेतर पॉप्युलॅरीटी म्हणायचे होते.... असे सांगतानाच प्रत्येक क्षेत्रातील समजून घेणारे शब्द असतात. ते आपण समजून घेतलेच पाहिजे असे मतही फमुंनी व्यक्त केले.