आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Government Grants For Balnatya Sammelan Joshi

बालनाट्य संमेलनास सरकारी अनुदान नकोच : जोशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेच्या वतीने राज्यात प्रथमच बालनाट्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान हे संमेलन सोलापूर येथे होणार आहे. या संमेलनासाठी राज्य सरकारकडे अनुदान मागणार नाही, अशी स्पष्टोक्ती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांनी गुरुवारी केली.

संमेलनांना सरकारी अनुदानावर अवलंबून राहावे लागू नये, अशी भूमिका आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सरकार अनुदान देतेच, मात्र राज्यात होणारे पहिले बालनाट्य संमेलन नाट्य परिषदेने स्वबळावर पार पाडावे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे अाम्ही राज्य सरकारकडे या संमेलनासाठी पैसे मागणार नाही, असे जोशी म्हणाले.

२५ लाखांचा हिशेब लवकरच देऊ
बेळगाव येथे नुकल्याच पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला विशेष बाब म्हणून राज्य सरकारने ५० लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यापैकी २५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले असून त्याचे हिशेबही सादर करण्यात आले आहेत. उर्वरित २५ लाखांच्या रकमेबाबत येत्या ३ ऑगस्ट रोजी मी स्वत:, माजी अर्थमंत्री अजित पवार आणि विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बैठक घेणार आहोत. या रकमेला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे, असे जोशी म्हणाले.