आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No One Untuchable In Politics, Shiv Sena Sometimes Sit With Congress Khadse

राजकारणात कोणीही 'अछूत' नसते, शिवसेनाही कधी काँग्रेससोबत बसते - एकनाथ खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - 'राजकारणात कोणीही 'अछूत' नसते, शिवसेनाही कधी काँग्रेससोबत बसते. तेव्हा शिवसेनेला काय वाटते याची चिंता करण्याची आम्हाला गरज वाटत नाही,' असे महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी येथे स्पष्ट केले.

बारामती येथील विश्रामगृहावर निवडक पत्रकारांशी ते शनिवारी बोलत होते. 'शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप हे स्वतंत्र पक्ष आहेत. इतरांची आणि आमची मते समान असू शकत नाहीत.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौ-यावरून भाजपच्या मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात खडसे बोलत होते.
मोदी यांच्या दौ-याकडे राजकीय अर्थाने पाहण्याची गरज नाही. आमची सलगी वाढली तरी कुठल्या चौकशा थांबणार नाहीत. सिंचन घोटाळा असो की अन्य घोटाळे, याच्या चौकशा होत राहतील, असे खडसे म्हणाले. बारामतीमधील कृषी प्रगतीची राज्याचा कृषिमंत्री म्हणून मला आनंदच आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढे वाचा, विखेंचे 'उशिरा'चे शहाणपण