आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Objection On Food Security Bill, But Agro Product Price Not Hiked Sharad Pawar

अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध नाही, फक्त शेतमालाच्या किमती पडू नये - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - ‘अन्न सुरक्षा योजनेला माझा विरोध नव्हताच. फक्त शेतमालाच्या किमती कमी होऊ नयेत, असा आग्रह होता,’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी या कायद्याचे समर्थन केले. सध्या भाजीपाल्याचे दर वाढल्याने महिलांना ठरावीक पैशात प्रपंच चालवणे अवघड होत आहे. गृहिणींनी केलेल्या काटकसरीचा नवीन पिढीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पूर्णान्न मिळालं तरच देशातील जनतेचे आरोग्यविषयक प्रश्न मिटतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


बारामती नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. पवार म्हणाले की, माणसाच्या पोषणांसाठी फक्त गहू आणि तांदूळ हेच पूर्णान्न नसून भाजीपाला, फळे, डाळी, खाद्यतेल, मासे-मांस याचीही मुबलक उपलब्धता असावी लागते. फूड अँड अ‍ॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन या जागतिक संघटनेच्या पाहणीनुसार फळ, भाजीपाला, डाळी, मांस याच्या उत्पादनात भारत 73 व्या क्रमांकावर आहे. पूर्णान्न न मिळाल्याने देशातील 73 टक्के बालकांमध्ये अशक्तपणा आहे.


पाण्याचा समतोल साधा
देशापुढे पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न असून आगामी काळात ही समस्या उग्र रूप धारण करणार आहे. शेतीला पाणी कमी पडल्याने या व्यवसायात स्थिरता येत नाही. उद्योग व शेती याचा पाणीवाटपाचा समतोल साधताना उद्योगांना मर्यादित तर शेतीला अधिक पाणी द्या. त्यासाठी शेती करण्याचे तंत्र बदलून ठिबक सिंचनासाठी साखर कारखान्यांनी मोहीम हाती घ्यावी. या मोहिमेला केंद्र सरकार मदत करेल, असेही पवार म्हणाले.