आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैराट फेम आर्चीला अधिकचे 25 गुण नको; पुण्यातील वकीलांचा आक्षेप, बोर्डाला पाठवली नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - सैराट चित्रपटातील अभिनेत्री आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे बाेर्डाकडून अधिकचे २५ कलागुण दिले जाणार आहेत. मात्र, याला अॅड. शब्बीर निलगर आणि अॅड.वाजेद खान-बीडकर यांनी विरोध दर्शवत पुणे विभाग राज्य मंडळाचे अध्यक्ष बबन दहिफळे यांना नाेटीस पाठवली अाहे.

अॅड. बीडकर म्हणाले,  राज्य मंडळातर्फे अभिनेत्रीला दिले जाणारे गुण हे काेणत्या कायद्यान्वये दिले जात अाहेत, हे स्पष्ट करणे अावश्यक अाहे. प्रत्येक नागरिकाला लाेकसेवकांच्या कार्यपद्धतीवर बाेलण्याचा अधिकार अाहे. त्याचा हेतू जनतेच्या हितासाठी असताे. त्यात खाेडसाळपणा किंवा द्वेष नसताे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वासाेबत काम केलेल्या बालकलाकाराला अतिरिक्त गुण यापूर्वी देण्यात आले नाहीत, तर रिंकू राजगुरू ही बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीच्या परीक्षेला बसली हाेती. विद्यार्थ्यांत शिक्षण ही महत्त्वाची भूमिका असून रिंकूमुळे इतर बहिस्थ विद्यार्थीही या प्रथेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कलागुण देताना नियमावलीत रिंकू बसते का? ही बाब सिद्ध केल्यानंतरच तिला गुण दिले जावेत. सदरची नाेटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत लेखी खुुलासा न केल्यास याबाबत याेग्य त्या न्यायालयात प्रकरण दाखल करावे लागेल, असा इशारा देण्यात अाला अाहे. त्यामुळे बोर्ड आता यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.