आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Asha Bhosle Opposes Participation Of Pakistani Artists In India

पाक कलाकारांचे स्वागत नको, आशा भोसलेंनी बदलला \'सूर\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सीमेवर शत्रूंनी आपल्या सैनिकांवर हल्ले चढवले. त्यांच्या पार्थिवाचा अपमान केला. पण चढाईचा गुणच आपल्यात नाही. आपण शांतताप्रेमी आहोत, अशी प्रतिक्रिया गायिका आशा भोसले यांनी रविवारी व्यक्त केली. यापुढे पाकिस्तानी कलाकारांचे स्वागत नको, असे स्पष्ट मतही नोंदवले. त्‍यामुळे पाकिस्‍तानी कलाकारांबद्दल आशा भोसलेंचा सूर बदलल्‍याचे स्‍पष्ट आहे.

एका वाहिनीवरील 'सूरक्षेत्र' कार्यक्रमात पाक कलावंतांचा सहभाग होता. त्‍यावेळी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी आशा भोसले यांच्‍यावर टीका केली होती. या कार्यक्रमात सहभागी होऊ नका अशा आशयाचे विनंती पत्र मनसेने आशा भोसले यांना पाठवले होते. दोघांमध्‍ये एक वेगळेच 'सूरक्षेत्र' दिसून आले होते. आशा भोसलेंनी भारत-पाक सामन्‍यांवरुन राज ठाकरेंना टोला लगावला होता. शिवसेनेनेही त्या वेळी कार्यक्रमाला तीव्र विरोध केला होता. अखेरीस राज ठाकरेंनी सौम्‍य भूमिका केल्‍यानंतर कार्यक्रमाला हिरवा कंदिल देण्‍यात आला.

दिल्लीतील अत्याचाराची घटना वेदनादायी असून, आरोपींना तातडीने शिक्षा केली पाहिजे,' असे मतही आशाताईंनी व्यक्त केले.