आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालभारतीची पुस्तके आता एका क्लिकवर, दोन महिन्यांत सुरू होणार ई-लायब्ररीची सुविधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आपली शालेय पाठ्यपुस्तके वाढत्या वयातही जपण्याची वृत्ती सार्वत्रिक दिसते. शाळकरी वयातील कविता उत्तरायुष्यातही आठवत राहतात. हा स्मरणरम्य काळ जागवण्याचे काम आता खुद्द ही पुस्तके छापणाऱ्या ‘बालभारती’नेच हाती घेतले आहे. जुनी पाठ्यपुस्तके एका क्लिकवर आता वाचकांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी ‘बालभारती’ चा ई लायब्ररी विभाग सज्ज होत आहे.
बालभारतीचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी ही माहिती दिली. दोन महिन्यांत ही पुस्तके ई-लायब्ररीवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. काही पुस्तके http://ebalbharati.in या संकेतस्थळावर पाहता येतील. ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने आजवर अनेक पाठ्यपुस्तके छापली आहेत. ती जुनी पाठ्यपुस्तके मिळतील का, अशी विचारणा सातत्याने होत होती. त्यामुळे मागणी लक्षात घेऊन जुन्या पुस्तकांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे. दोन महिन्यात ते पूर्ण होईल, अशी आशा आहे.’

अशी असेल लायब्ररी
Áपहिल्या टप्पा दोन महिन्यांत
Áपहिली ते आठवीची पाठ्यपुस्तके
Áमराठीच्या पुस्तकांना प्राधान्य
Áसंकेतस्थळावर करणार अपलोड

वाचकांची नोंद हाेणार
^या नव्या उपक्रमाचा लाभ नेमक्या किती जणांनी घेतला, देशात वा विदेशात कुणी जुनी पाठ्यपुस्तके पाहिली, याची नोंदही बालभारती ठेवणार आहे. पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने त्याचीही आकडेवारी तपासली जाईल.
चंद्रमणी बोरकर, संचालक, बालभारती