आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Children Make Child Movies, Little Directors Initiative

मुलेच तयार करणार आता बालचित्रपट, 'लिटल डायरेक्टर्स’चा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - खास मुलांसाठी चित्रपट निर्माण करणा-या ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी, इंडिया’ने आता मुलांसाठी चित्रपट बनवतानाच मुलांनाच चित्रपट बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चा पुढाकार असेल.
त्यामुळे बच्चे कंपनीसाठी आता बच्चेमंडळीच चित्रपट बनवू शकतील. ‘या उपक्रमात देशभरातील शाळांमधील मुलांना सहभागी करून घेण्यात येईल. शाळांनी आपल्या मुलांमधील कौशल्ये आमच्यापर्यंत पोचवायची आहेत.
देशातील प्रमुख शहरांतून सीएफएस विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करणार आहे. या कार्यशाळांत विविध तज्ज्ञ मुलांना चित्रपट निर्मितीविषयीचे प्रशिक्षण देतील. मुलांकडून कार्यशाळेतच लेखन, संवाद, दिग्दर्शन, संकलन, संगीत आदी घटकांचे सादरीकरण होईल. त्यातून मुलांची टीम निवडली जाईल,’ अशी माहिती सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रवणकुमार यांनी दिली.

अशी असेल कार्यशाळा
>चित्रपटनिर्मितीच्या प्रत्येक घटकाचे ज्ञान
>तांत्रिक व यांत्रिक माहिती
>कौशल्यविकासासाठी मार्गदर्शन
>आर्थिक साह्य कसे मिळवावे, याच्या टिप्स
>चित्रपटाची क्रिएटिव्ह, टेक्निकल, फायनान्शियल बाजू

सीएफएसचे कार्य
>पं. नेहरूंच्या संकल्पनेतून निर्मिती
>१९५५ पासून कार्यरत
>आजवर २५० बालचित्रपटांची निर्मिती
>देशातील १० भाषांमध्ये बालचित्रपट
>अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात पुरस्कार

कलाविश्वाला नवा आधार मिळेल
सोसायटी अनेक वर्षे बालचित्रपटांची निर्मिती करत आहे. आता मुलांनीच मुलांसाठी चित्रपट बनवावेत, अशी कल्पना आहे. मुलांमधील कल्पकता, हुशारी आणि सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळेल आणि या लिटल डायरेक्टर्समधून भावी कलाविश्वाला नवे आधार मिळतील.
डॉ. श्रवणकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीएफएसआय