आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - व्यावसायिक नाटकाचा प्रयोग असो की प्रायोगिक, एकांकिका असो की एकपात्री..त्या त्या संहितेला अत्यावश्यक असलेले मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे (सेन्सॉरचे) परवाना प्रमाणपत्र घेण्यासाठी आता मुंबईला खेटे मारावे लागणार नाहीत. ही सुविधा आता नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतही उपलब्ध होणार आहे.
रविवारी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले. स्थानिक पातळीवर रंगकर्मींना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणारी नाट्य परिषदेची पुणे शाखा पहिलीच ठरली आहे. अशा प्रकारची विकेंद्रित सेन्सॉर सेवा देण्यास कसलीच हरकत नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. या वेळी पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देश्मुख, अविनाश देशमुख, दादा पासलकर, दीपक रेगे, निकिता मोघे, मकरंद टिल्लू, मेघराज राजे भोसले आदी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, आज रंगभूमीवर नवे विषय, नव्या उज्रेने लिहिले जात आहेत. संहितेच्या मान्यतेचा कालावधी एक वर्ष असतो. त्यानंतर पुन्हा प्रयोग करायचे असतील तर परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी 250 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र प्रवास व इतर खर्च खूप होतो. त्यापेक्षा या सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करण्यासाठी कुणी पुढाकार घेतल्यास परवानगी देता येईल. 13 वर्षांपूर्वी मी सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष झालो तेव्हा उत्पन्न दोन लाख रुपये होते आज ते 85 लाख रुपये आहे, असा उल्लेखही शिंदे यांनी केला.
परिचयपत्र हाच हृदयनामा : फ. मुं. शिंदे
साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक ही सन्मानाची प्रक्रिया आहे. ते सत्तेचे पद नाही. त्याचा जाहीरनामा नाही. मी मतदारांना पाठवलेले परिचयपत्र हाच माझा हृदयनामा आहे. आम्ही चार उमेदवार प्रतिस्पर्धी नाही तर मराठी भाषेचे प्रतिनिधी आहोत आणि माणुसकी हेच लेखनाचे अधिष्ठान आहे. फ.मुं.शिंदे, अध्यक्ष, मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.