आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पुण्यातील रिक्षावाले इंग्रजीत बोलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील रिक्षावाले हा अनेकांच्या कुतूहलाचा, काहीसा रागाचा विषय असतो. इच्छित ठिकाणी जाण्यास हमखास नकार देणारे वा अवाजवी भाडे मागणारे रिक्षावाले आता मात्र एकदम बदलणार आहेत. योग्य ते मॅनर्स आणि तेही इंग्रजीतून ते शिकत आहेत. शिवाय त्यांना संगणक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.


पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे 80 रिक्षाचालकांना इंग्रजी संभाषण आणि संगणक यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. याप्रसंगी रिक्षाचालकांनी स्वयंस्फूर्तीने इंग्रजीतून नाटुकली, पथनाट्य व सादरीकरण केले. रिक्षाचालक अजय इथापे म्हणाले, मी जुजबी शिकलेला, पण मित्रांच्या प्रोत्साहनाने या वर्गाला आलो आणि त्यामुळे व्यक्तिमत्त्वात झालेला बदल पाहून मलाच माझे आश्चर्य वाटते आहे. संगणक आणि इंग्रजी शिकल्याने हा बदल घडला आहे. रिक्षावालेकाका शेखर शिवलेकर म्हणाले, इंग्रजी माध्यमातील मुलांशी संवाद साधणे मला सहज जमेल. शिवाय विदेशी लोक बसले तर त्यांच्याशी बोलता येईल.
आधुनिक काळात इंग्रजी आणि संगणक यांचे प्राथमिक ज्ञान सर्वांसाठीच गरजेचे आहे. त्याला रिक्षाचालकही अपवाद नाहीतच. आमच्या संस्थेतर्फे यासाठीच अशा मोफत प्रशिक्षणाची सुरुवात आम्ही करू शकलो आणि अनेकांना त्यांचा फायदा होत आहे याचे समाधान वाटते. संजय चोरडिया, अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट