पुणे - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यात सर्वाधिक पेड न्यूजची प्रकरणे पुणे जिल्ह्यात उघडकीस आली असून एकूण ७८ पेड न्यूज प्रकरणे समोर आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.राव म्हणाले, पुण्यातील एकूण ७८ पेड न्यूज प्रकरणात ७९ जणांना नोटिसा दिलेल्या असून त्यापैकी ६५ जणांचा खुलासा प्राप्त झाला आहे.
निवडणूक समितीने यापैकी १४ खुलासे मान्य केले असून एकूण ५१ पेड न्यूज ठरलेले प्रकरण दाखल केले आहेत. प्रचारादरम्यान काळात आचारसंहिता भंगच्या एकूण २५३ तक्रारी प्राप्त झाल्या असून २४ तक्रारीबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रचारादरम्यान एकूण आठ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून त्यापैकी पाच काेटी २२ लाख रुपयांची रक्कम चौकशी करून परत करण्यात आली आहे. उर्वरित तीन कोटी ४२ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.