आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरवर वादग्रस्त मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - काेथरूड परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ट्विटरवर वादग्रस्त मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमितेष विजयसिंह काटे असे त्याचे नाव आहे. अमितेषने ताे भाजपचा सदस्य असल्याचा दावा करत हे टि्वट केले. अासाम येथील रिसर्च अँड अाॅपरेशन्स स्ट्राटेजिक रिसर्च अँड अॅनालिसिस अाॅर्गनायझेशनचे संचालक निलीम दत्त यांनी पुणे पाेलिस अायुक्तांना ई-मेल करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.