आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओडिशातील प्रेमीयुगुलाची पुण्याजवळ आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एरवी सुखरूप पोचल्याचा एसएमएस करणा-या मुलाने आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज वडिलांना करावा आणि त्यानुसार कृतीही करावी, अशी घटना पुण्याजवळील मोशी येथे घडली. या मुलाने प्रेयसीलाही गळफास घ्यायला प्रवृत्त केले आणि एका प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी अंत झाला. हे प्रेमीयुगुल मूळचे ओडिशातील होते.

राकेशकुमार हृषीकेश स्वाईन (24, रा. मोशी) आणि इतिश्री रामचंद्र स्वाईन (23) अशी मृतांची नावे आहेत. राकेशकुमार याचे कुटुंबीय ओडिशातील मूळ गावी उत्सवासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी राकेशने वडिलांना आत्महत्या करत असल्याचा एसएमएस केला. तो पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधला. भोसरी पोलिस घटनास्थळी आले. पण घराला कुलुप होते. त्यामुळे दरवाजा तोडला असता घरात दोघांचेही मृतदेह दिसून आले.