आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Offender Vice Principal Lacation In School ;pune Girl Student Molestation Case

आरोपी उपप्राचार्याचे लोकेशन शाळेतच ; पुण्यातील विद्यार्थिनीचे विनयभंग प्रकरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येरवडा परिसरातील डॉन बॉस्को शाळेतील उपप्राचार्य फादर इज्यू फ्रान्सिस फलकाऊ (वय 61) याने दोन जानेवारी रोजी शाळेतीलच दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता घटनेच्या दिवशी पीडित मुलगी व आरोपी उपप्राचार्य यांच्या मोबाइलचे लोकेशन शाळेतच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे घटनेच्या दिवशी पीडित मुलगी शाळेतच आली नव्हती, हा शाळेचा दावा खोटा ठरला आहे.

दरम्यान, न्यायालयाने शुक्रवारी आरोपीच्या कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ केली. पोलिस उपनिरीक्षक रेश्मा मुलाणी यांनी न्यायालयात सांगितले की, तपासात आरोपी पोलिसांना असहकार्य करत आहे. यापूर्वी तो मुंबईत वसंत विहार व माटुंगा या ठिकाणी कार्यरत होता, तेथे राजीनामा दिल्यानंतर तो पुण्यात नोकरीस लागला. मुंबईतील शाळांमध्ये माहिती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
फादरसाठी प्रार्थना
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेने मुलीला दोष देत उपप्राचार्य फादर फालकाऊची पाठराखण केली होती. तसेच शुक्रवारी फादरला न्यायालयात आणले असता त्याच्या सुमारे 100 समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली, तर काहींनी प्रवेशद्वाराजवळ प्रार्थनाही केली.