आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ola Cab Driver Arrested After Rape Threat To Passenger At Pune

पुणे : ओला कॅब चालकाने केला विनयभंग, ओढली ओढणी, रेपची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील एका 38 वर्षीय महिला प्रवाशाचा ओला कॅबच्‍या एका चालकाने विनयभंग केल्‍याची तक्रार गुरुवारी सायंकाळी कोंडवा पोलिस ठाण्‍यात दाखल झाली. त्‍या आधारे पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली.
या महिलेने आपल्‍या मुलाला शाळेत सोडण्‍यासासाठी 'ओला कॅब' बूक केली होती. दरम्‍यान, चालकाने तिच्‍यासोबत अश्‍लील चाळे करून त्रस्‍त केले. एवढेच नाही तर त्‍याने तिला घाणेरड्या शिव्‍या दिल्‍या, ओढणी ओढली आणि बलात्‍कार करण्‍याचा प्रयत्‍न केला, असा आरोप पीडित महिलेने केला. शिवाय पीडित महिलेने या घटनेबाबत फेसबुक पेजवर पोस्‍टसुद्धा टाकली. अभिमान मस्‍के (29) असे आरोपी चालकाचे नाव असून, तो सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा या गावाचा रहिवाशी आहे.
चालकाने महिलेसोबत नेमके काय केले ?
पीडित महिला पुण्‍यातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्‍ये अर्धवेळ प्राध्‍यापिका आहे. या घटनेबाबत पीडित महिलेने सांगितले की , "माझ्या मुलाला शाळेत सोडण्‍यासाठी मी ओला कॅब हायर केली. कारमध्‍ये बसतात. माला चालक अभिमान मस्‍के (35) याचा व्यवहार ठीक वाटला नाही. तो वारंवार कारमध्‍ये असलेल्‍या आरशाला हात लावून माझ्याकडे पाहत होता आणि अनावश्यक गप्‍पा करत होता. दरम्‍यान, माझी तब्‍येत बिघडल्‍याचे कारण देत मी त्‍याला कारमध्‍येच थांबवण्‍याचे सांगितले. पण, त्‍याने ऐकले नाही. उलट तो म्‍हणाला, ' तुझ्या बापाची टॅक्सी आहे का?, तुम्‍हा आईटीवाल्‍यांना माज चढला आहे महाराष्‍ट्रात येऊन, उचलून घेऊन जाईल आणि काहीही करेल, पुरवाच राहणार नाही असे ते म्‍हणाला'', असे पीडित महिलेने सांगितले.
ओढणी ओढण्‍याचा प्रयत्‍न
चालकाचे हे बोलणे ऐकून पीडित महिला खूप घाबरली. तिने मुलाच्‍या शाळेपर्यंत पोहोचण्‍याची वाट पाहिली. कार जशी शाळेजवळ पोहोचताच महिलेने त्‍याची तक्रार करण्‍यासाठी पर्समधून फोन काढला. त्‍यामुळे चालक अधिकच भडकला आणि त्‍याने तिची ओढणी ओढण्‍याचा प्रयत्‍न केला. महिलेने सांगितले की, चालक तिला म्‍हणाला, 'रेप करून फेकून देईल. पैसे दे आणि नीघ इथून.' त्‍यावर महिला चूपचाप निघाली आणि शाळेत गेली. तिथे 100 नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली.

पुढील स्‍लाइडसवर वाचा, 20 मिनिटांत चालकाला पकडले...