आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्ग लिंगाण्यावर अतिप्राचीन गुहा सापडली; दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सह्याद्रीच्या मुख्य रांगेतला महत्त्वाचा दुर्ग म्हणून ओळखला जाणार्‍या दुर्ग लिंगाण्यावर अतिप्राचीन गुहा शोधल्याचा दावा येथील दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेने येथे केला. या मोहिमेचे दृकश्राव्य छायाचित्रण, छायाचित्रे व अन्य तपशीलही संस्थेने सादर केले. एकूण पाच दिवसांच्या मोहिमेनंतर ३३ दुर्गप्रेमी सदस्यांनी दुर्गावरील ही अतिप्राचीन गुहा शोधण्याची मोहीम यशस्वी केली. या संदर्भात इतिहासतज्ज्ञांशी पुढील चर्चा सुरू असल्याचे संस्थेने सांगितले.

अशी झाली मोहीम
>एकूण ३३ सदस्यांचा सहभाग
>पाच दिवसांची मोहीम
>चार मैल लांबीच्या खड्या चढणीसाठी प्रस्तरारोहण
>लिंगाण्याच्या पायथ्याशी पाणेगाव येथे बेस कॅंप
>तेथून लिंगाणा माची दोन किलोमीटर खडी चढण
>पूर्वेकडील चढाईसाठीचा दीड तास
>शिखरापर्यंतची चढाई महाकठीण व दुर्गम
>शिखरापासून पुन्हा रायलिंग पठारापर्यंत चढाई
>तेथून उत्तरेकडील कड्यामध्ये गुहेचा शोध

दुर्ग लिंगाणा व परिसर असा आहे
>लिंगाणा हा सह्याद्रीच्या रायगड डोंगररांगेत आहे
>लिंगाणा हा गिरीदुर्ग प्रकारातील गड आहे
>किल्ल्याची उंची तीन हजार फूट
>चढाईसाठी श्रेणी – अतिकठीण
>महाडच्या ईशान्येस सोळा मैलांवर स्थान
>सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा आणि रायगड यांच्या दरम्यानचे स्थान
>ऐतिहासिक काळात लिंगाणा हे कारागृह होते
>बेलाग सुळका, निसरडी माती, अतिदुर्गमता ही वैशिष्ट्ये

अशी आहे शोधलेली गुहा
>अखेड खडकात खोदलेली गुहा
>लांबी नऊ फूट, रुंदी साडेसात फूट
>उंची तीन फूट सात इंच
>गुहेचा दरवाजा उत्तराभिमुखी
>दरवाजा पाच फूट रुंद, 3.7 फूट उंच

'लिंगाण्यावरील या प्राचीन गुहेचा वापर पूर्वी पहाऱ्याची गुप्त चौकी म्हणून होत असावा कारण सुळक्याच्या इतक्या पोटात तिचे स्थान आहे, की वरवर पाहिल्यास कुणाच्या लक्षातही गुहेचे स्थान येत नाही. गुहा दोन व्यक्तींसाठी असावी, अशी तिची रचना दिसते. आम्ही इतिहासतज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर गुहेच्या अंतरंगावर अधिक प्रकाश पडेल.'
– सुनील पिसाळ, अध्यक्ष, दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था

हे आहेत टीमचे सदस्य
सुनील काकडे, ऋषिकेश चिंचोले, विशाल फरांदे, समीर हजारे, सुनील पिसाळ

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दुर्ग लिंगाण्याचे फोटो...